हनुमानचलिसा पठण

हनुमानचलिसा पठण

सर्व श्रद्धावानांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे, दरवर्षी श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ मध्ये होणारे हनुमानचलिसा पठण ह्या वर्षीच्या अधिक आश्विन मासात, सोमवार दि. २१ सप्टेंबर २०२० ते रविवार दि. २७ सप्टेंबर २०२० ह्या ७ दिवसांमध्ये संपन्न होणार आहे. मात्र ह्या वर्षी गुरुक्षेत्रम्‌ मध्ये प्रत्यक्ष पठण करता येत नसल्याची अडचण लक्षात घेऊन, मागील काही वर्षांच्या रेकॉर्डिंगचा वापर करून, अनिरुद्ध टी.व्ही., फेसबुक पेज, यु. ट्युब.च्या माध्यमातून तसेच ’अनिरुद्ध भजन म्युझिक रेडिओ’ वरून (ऑडिओ स्वरूपात) श्रद्धावानांसाठी ह्या पठणाचा लाभ घेण्याची सोय करण्यात आली आहे.

ह्या पठणामध्ये प्रत्येक श्रद्धावान आपापल्या घरी बसून एक दिवस अथवा त्याची इच्छा असल्यास एकापेक्षा जास्त दिवसही जपक म्हणून सहभागी होऊ शकतो. मात्र नेहमीच्या पद्धतीप्रमाणे प्रत्येक दिवशी ह्या पठणामध्ये "A" व "B" अशा दोन बॅचेस असतील व त्या त्या दिवसाच्या पठणामध्ये प्रत्येक श्रद्धावान जपक दोनपैकी एकाच बॅचमध्ये नाव नोंदणी करू शकेल.

पठणाचे वेळापत्रक खाली दिल्याप्रमाणे असेल.

 "A" बॅच"B" बॅचआवर्तनंदोन्ही बॅचेसमधील श्रद्धावानांस एकेक तासाचे आवर्तन असेल व दिवसभरात त्यांना एकूण सहा वेळा आवर्तनास बसावे लागेल. "A" बॅचचे आवर्तन चालू असताना "B" बॅचच्या श्रद्धावानांस विश्रांती असेल व तसेच "B" बॅचचे आवर्तन चालू असताना "A" बॅचच्या श्रद्धावानांस विश्रांती असेल.
. .०० - .१५ दोन्ही बॅचेस एकत्र
८.१५ - ९.००९.०० - १०.००८ + ११
१०.०० - ११.००११.०० - १२.००११ + ११
१२.०० - १.००१.०० - २.००११ + ११
२.०० - ३.००३.०० - ४.००११ + ११
४.०० - ५.००५.०० - ६.००११ + ११
६.०० - ७.००७.०० -  ८.००११ + ११
 सायं. ८.०० ते ८. १५ दोन्ही बॅचेस एकत्र

ह्या पठणात सहभागी होण्यास नाव नोंदणी करण्यासाठी श्रद्धावान रविवार, दि. १३ सप्टेंबर २०२० पासून खाली दिलेल्या वेबसाइट लिंकवर क्लिक करून आपली नाव नोंदणी करू शकतात.

नाव नोंदणीसाठी वेबसाइट लिंक - https://pathan.aniruddha-devotionsentience.com

तसेच एखाद्या श्रद्धावानाला संपूर्ण दिवस जपक म्हणून सहभागी होणे शक्य नसल्यास, तो पठणाच्या ह्या सात दिवसांमध्ये दिवसभरात कुठल्याही वेळेला त्याच्या सोईनुसार पठणामध्ये सहभाग घेऊ शकतो.

जपकांसाठी जेवणाच्या पथ्याचे अथवा ड्रेस कोडचे कसलेही बंधन असणार नाही ह्याची सर्व श्रद्धावानांनी नोंद घ्यावी. परंतु मांसाहार सेवन न करणे श्रेयस्कर.

तरी सद्‍गुरु अनिरुद्धांच्या कृपाशिर्वादाने लाभलेल्या ह्या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त श्रद्धावानांनी लाभ घ्यावा.

| हरि ॐ | श्रीराम | अंबज्ञ |

| नाथसंविध्‌ |

- समीरसिंह दत्तोपाध्ये

शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर २०२०

Scroll to top