हरि ओम
खरच *आजचा 1638 वा अग्रलेख म्हणजे मूर्तिमंत प्रेमाच्या रूपाचा अनोखा अविष्कार* .
मी केलेल्या ,माझ्याकडून घडलेल्या आणि इतरांना आवडलेल्या गोष्टींकडे
पाहण्याचा माझा दृष्टीकोन जर “मी पणाच्या” गर्तेत सापडला की त्या गोष्टी किती ही सुन्दर भासल्या,
इतरांना कौतुकास्पद वाटल्या तरी मलाच त्या तितक्या भावत नाहीत ,त्यात काही तरी कमतरता जाणवते,
पण ती काय असते हे आजचा अग्रलेख स्पष्ट करतो..
या अग्रलेखातल्या गोष्टीतील मधुसूदनाची खंत, म्हणजेच
” *स्नेहाच्या अभावाची जाणीव* ”
माझे जिवन घडवताना ,ते अधिकाधिक सुंखी, समृद्ध करण्याच्या नादात प्रयत्नांच्या राजमार्गावर धावत असताना ,वाटेत येणाऱ्या छोट्या *छोट्या आनंदाच्या पाऊलवाटा* माझ्या कर्मस्वातंत्र्यामुळे माझ्या कळतं-न कळत दुर्लक्षिल्या जातात,आणि सारे काही मिळूनही मी मात्र रिकामाच रहातो ,कमतरतेच्या चक्रव्यूहात वारंवार अडकत राहतो आणि तेव्हा तेव्हा मला त्यातून बाहेर काढण्यासाठी हा *चक्रपाणी , स्वयंभगवान श्रीत्रिविक्रम* धाव घेतो, मला त्या मीपणाच्या मगरमिठीतून सोडवण्यासाठी , अभावाच्या गर्तेतूंन बाहेर काढण्यासाठी !
हेच ते जीवनातल्या समाधानाचे रहस्य असावे का ! *माझ्या कणभर प्रेमाला ह्याच्या* *मणभर प्रेमाची जोड लाभली की* *मग खरी सुंदर मूर्ती घडते* ‘मी भक्तीभावचैतन्यातच रहातो’ हा माझा समज असणं आणी ‘भक्तीभावचैतन्यामध्ये मी राहणं’ ह्यातला फरक मला वरकरणी कळत नसला *तरी त्याला सर्व समजतेच* ह्याची जाणीव व हा विश्वासच मला माझ्या जीवनातल्या असंख्य विविध मूर्ती घडवण्यासाठी बळ देतो. हा माझा पिता, माझ्यातल्या भरकटलेल्या ‘मी’ ला प्रसंगी लाथ मारून वठणीवर आणतो, हा अभयहस्त ,प्रसंगी चोप देऊन माझ्या बुद्धी ला ताळयावर आणतो !
*भक्तिभावचैतन्यात राहणं’ म्हणजे* *त्या सावळ्याच्या प्रेमात आकंठ बुडण* च होय ना ! … प्रेम देणारा ही तोच, आणी प्रेम घेणाराही…!
प्रेमाने घडणारा ही तोच आणी प्रेमाने घडवणाराही..! प्रेम करणारा ही तोच, आणि प्रेम करून घेणाराही ! मला फक्त या प्रेमसागरावर प्रेम करता यायला हवे , “जसे जमेल तसे” & its ongoing process ..
जीवनात स्वयंभगवानाची मूर्ती घडवण्यासाठी अखंड अविरत चालणारा हा प्रवास. एका जन्मातून दुसऱ्या जन्मापर्यंतचा एका युगातून दूसऱ्या युगापर्यंतचा.
*प्रत्येकाचा त्रिविक्रम वेगळा*.. भक्तीभावचैतन्यात ठेवण्यासाठी’ प्रसंगी भरकटलेल्या लेकरांच्या पेकाटात लाथ हाणून त्यांना मार्गावर आणणारा…एक सख्खा बापच हे करू शकतो ,अन्य कुंणीच नाही.. *कारण बापाची लाठी बाळांना कधीच वेदना देत नाही ती प्रेरणाच देत राहते* *अधिकाधिक भक्तिभावचैतन्यात*
*राहण्यासाठी* ?
*मार आम्हा लाथ ,करी बा ताडण*
*हेचि आम्हालागी कारण भक्तीचे*
*भाग्यवान आम्ही जाहलो संसारी*
*लाभले चरण श्रीत्रिविक्रमाचे*?
जय त्रिविक्रम मंगलधाम ,
श्रीत्रिविक्रम पाही माम???
श्रीराम अंबद्न्य नाथसंविध
राजश्रीवीरा चुरी
लाईक, कमेंट व शेअर करण्यासाठी अनिरुद्ध प्रेमसागर श्रद्धावान नेटवर्कशी जोडुन घ्या.
या श्रद्धावान नेटवर्कवरील काही चांगल्या पोस्ट या ‘फिचर्ड पोस्ट‘ म्हणून निवडल्या जाणार आहेत.
अलीकडील पोस्ट
- धनत्रयोदशी – श्री धनलक्ष्मी श्रीयंत्र पूजन
- गोवत्सद्वादशी – वसुबारस
- Shree Krupachaitanya Paduka Pravachan | Aniruddha Bapu Pravachan (Marathi) | 02nd Nov 2023
- Om Hariharaya Namah – Imp Announcement | Aniruddha Bapu Pravachan(Marathi)| Harigurudas/Harigurudasi
- Om Hariharaya Namah – Pravachan by Sadguru Aniruddha Bapu (Marathi) on Trivikram Anant Namavali