श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराज

अध्यात्म, आपल्यापैकी बहुतेक जणांचा अध्यात्माकडे ओढा असतो, केवळ ओढा असतो असे नाही, तर अनेकांना अध्यात्मात खरोखरच रस असतो. मात्र आपल्यापैकी बहुतेकांना काही मूलभूत प्रश्न समजत नाहीत आणि जर ते प्रश्न आपल्याला समजलेचं नाहीत, तर आपण त्यांची उत्तरे कशी शोधणार आणि त्याच बरोबरीने अनेक ग्रंथ असा दावा करतात की त्यांनी स्वतः मांडलेले सत्य हेच केवळ एकमेव सत्य आहे. असे ग्रंथ आपला आध्यात्मिक मार्ग अधिकच कठीण करतात.

सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू लिखीत ’श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराज’चे त्रिखंड आपल्याला केवळ मार्गदर्शनच करत नाहीत, तर धैर्य, सामर्थ्य आणि भगवंताला शोधण्याचा सुस्पष्ट नकाशा आपल्या हातात देतात, आपल्या जीवनात शांती व आनंद प्रदान करतात आणि त्याचबरोबर आपल्या बहुतेक प्रश्नांची सोप्या आणि सुंदर भाषेत उत्तरे देतात.

सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू स्पष्टपणे सांगतात की त्यांचे हे लेखन स्वत:चे नसून भारतीय आध्यात्मिक वाङमयांचे उदा. वेद, उपनिषदे, पुराणे, गीता, रामायण, ब्रह्मसूत्र आणि संतवाङमय यांचा उचित संग्रह आणि संकलन आहे.

श्रीमद्पुरुषार्थ आपल्याला अध्यात्माच्या शाश्वत मार्गाकडे घेऊन जातो. हा मार्ग ‘सत्या’चा आहे, हा मार्ग ‘प्रेमा’चा (ईश्वरी प्रेमाचा) आहे आणि हा मार्ग ‘आनंदा’चा आहे.

या श्रीमद्पुरुषार् त्रिखंडातील हा पहिला खंड 'सत्यप्रवेश', आपल्या जीवनप्रवासात निर्मळ शांती आणि निर्भेळ आनंद साध्य करून घेण्यासाठी जरूरी असणारी मूलभूत व आवश्यक तत्त्वे, पद्धती आणि शुद्ध व प्रगल्भ ज्ञान याबद्दल अधिक सविस्तर विवरण करून सांगतो आणि त्याच वेळी आपल्याला आपल्या इष्ट देवतेच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो.

आपल्याला कसलाही शोध लावण्याची आवश्यकता नाही. ह्या ग्रंथाचे वाचन करत असताना तुमच्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी दत्तगुरुंच्या आणि आई जगदंबेच्या कृपेने तुमच्या समोर उलगडतील अशी सद्गुरु श्रीअनिरुद्धांची ग्वाही आहे.

Sadguru Shree Aniruddha Bapu | Shreemad Purusharth Granthraj
author avatar
Kshitija Natu
Scroll to top