मातृवात्सल्य - उपनिषद् अर्थात श्रीस्वस्तिक्षेमविद्या
हा ग्रंथ म्हणजे आदिमाता चण्डिकेची अनंत क्षमा, आपुलकी व अपरंपार वात्सल्य. सर्व शंका, कुशंका, तर्क, कुतर्क, भय आणि विषाद या उपनिषदाच्या पठणातून कायमचे नाहीसे होत जातात.
हे उपनिषद् म्हणजे सद्गुरु श्री अनिरुद्धांनी केलेल्या ’स्वस्तिक्षेम तपश्र्चर्ये'चे फलीत आहे, जे त्यांनी त्यांच्या श्रद्धावान मित्रांसाठी खुले केले आहे. सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी सांगितल्याप्रमाणे या वात्सल्यग्रंथात पारायण पद्धती नाही, हे उपनिषद् प्रेमाने आणि विश्वासाने वाचायचं आणि जमेल तसं वाचत रहायचं.
चण्डिकेचे प्रत्येक शस्त्र श्रद्धावांनांच्या जीवनात कसे कार्य करते हे या ग्रंथाच्या वाचनातून अनुभवता येते.