अनिरुद्धांचे अनिरुद्धत्व – लेखक अनिरुद्ध बापूभक्त ओमसिंह नवलाखे

अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य ‣

खरंच ह्या अनिरुद्धांचे अनिरुद्धत्व प्रत्येक श्रद्धावानाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे जाणवतच असतं. काहीना त्याची जाणीव होते काहींना होत नाही. पण तरीही त्यांचे अनिरुध्द प्रेम, अनिरुद्ध क्षमा, अनिरुद्ध कारुण्य आणि त्यांच्याकडून प्रक्षेपित होणारा नवांकुर ऐश्वर्यांचा अनिरुद्ध प्रवाह प्रत्येक श्रद्धावानाला अनिरुध्दगतीने भेटतच राहतो.

त्यांचा भक्त जगाच्याच काय ह्या संपूर्ण ब्रह्मांडाच्या कुठल्याही कानकोपऱ्यात असू दे पण त्यांच प्रेम त्याच्या प्रत्येक बाळाकडे अनिरुद्ध गतीने पोहोचतच असतं. मग ह्या प्रेमप्रवाहाच्या आड त्या श्रद्धावानाचं पापं-पुण्य, प्रारब्ध कितीही प्रबळ असलं तरीही ते येऊ शकत नाही.

ह्यासाठी भक्ताला काहीही करावे लागत नाही. या अनिरुद्धांच्या अनिरुध्द प्रेमप्रवाहाची जाणीवच सर्व काही करू शकते.

"माझ्या सद्‍गुरूचं माझ्यावर खूप प्रेम आहे. जे कधीही न संपणारं प्रेम आहे "

ह्या वाक्यावर आधी विश्वास ठेवणं आणि त्यावर कितीही संकट, अडचणी आल्या तरी त्यावर अढळ राहणं हे सर्वात महत्वाचं असतं. जसा जसा भक्ताचा सदगुरु अनिरुद्धांच्या अनिरुध्द प्रेमावरचा विश्वास वाढू लागतो तसा तसा भक्ताला त्यांचे अस्तित्व, त्यांची वेळोवेळी होणारी मदत, प्रत्येक क्षणी असणारी त्यांची सोबत जाणवू लागते. यामुळे त्या भक्ताचेही अनिरुद्धांवर प्रेम जडू लागते आणि त्या भक्ताच्या मनात आपण अनिरुद्धांचे लाडके अपत्य आहोत ही भावना प्रबळ होऊ लागते. आणि इथेच खरी त्याची नवविधा भक्ती अनिरुध्दगतीने सुरु होते.

आणि हीच नवाविधा भक्ती त्या भक्ताची पिपासा जागृत करून कधी त्याला सद्‍गुरु अनिरुद्धांचे सामीप्य प्रदान करते हे त्या भक्तालासुद्धा कळत नाही. हे सर्व फक्त एकाच गोष्टीमुळे होऊ शकतं ते म्हणजे अनिरुद्धांच्या अनिरुध्द प्रेमाची जाणीव.

ओमसिंह नवलाखे

Scroll to top