घन चैतन्याचे घन जाते न्हाऊनिया मन
भक्तिभाव चैतन्याचे सारे आभाळ पांघरून ||
त्याचे शब्द तेच मोती
देह भिजतो कृपेने
अतरंग मोहरते
त्याच्या एक एका थेंबाने
आली सुखाची सावली, सरले दुःखाचे ऊन || 1||
भक्तिभाव चैतन्याचे सारे आभाळ पांघरून||
आता राहिले न मन
त्याचे जाहले चित्त
बापू सोबतीस राहे
तेच धन तेच वित्त
तुझ्या पंखात राहू दे कधी सरो ना हे ऋण ||2||
भक्तिभाव चैतन्याचे सारे आभाळ पांघरून||
घन बरसती असे
त्यात नाहते प्रारब्ध
कुठे मोजतो हा पाप
माय बाप अनिरुद्ध
ओंजळ भरली सुखाने, त्यात आनंदाचे क्षण ||3||
भक्तिभाव चैतन्याचे सारे आभाळ पांघरून ||
घन चैतन्याचे घन जाते न्हाऊनिया मन
भक्तिभाव चैतन्याचे सारे आभाळ पांघरून||

अलीकडील पोस्ट
- ॐ शिवनारायणाय नम: – त्रिविक्रम अनंत नामवलीवर सद्गुरु अनिरुद्ध बापू यांचे प्रवचन – भाग १
- श्री हनुमान पौर्णिमा उत्सव
- ॐ हरिहराय नमः – त्रिविक्रम अनंत नामवलीवर सद्गुरु अनिरुद्ध बापू यांचे प्रवचन – भाग १०
- ॐ हरिहराय नमः – त्रिविक्रम अनंत नामवलीवर सद्गुरु अनिरुद्ध बापू यांचे प्रवचन – भाग ८
- ॐ हरिहराय नमः – त्रिविक्रम अनंत नामवलीवर सद्गुरु अनिरुद्ध बापू यांचे प्रवचन – भाग ९