॥ घोरकष्टोद्धरणस्तोत्रम् ॥
श्रीपाद श्रीवल्लभ त्वम् सदैव श्रीदत्तास्मान्पाहि देवाधिदेव ।
भावग्राह्य क्लेशहारिन्सुकीर्ते घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥ १ ॥
त्वम् नो माता त्वम् पिताऽऽप्तोऽधिपस्त्वम् त्राता योगक्षेमकृत्सद्गुरुस्त्वम् ।
त्वम् सर्वस्वम् नोऽप्रभो विश्वमूर्ते घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥ २ ॥
पापम् तापम् व्याधिमाधिम् च दैन्यम् भीतिम् क्लेशम् त्वम् हराऽऽशु त्वदन्यम् ।
त्रातारम् नो वीक्ष्य ईशास्तजूर्ते घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥ ३ ॥
नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वत्तो देव त्वम् शरण्योऽकहर्ता ।
कुर्वात्रेयानुग्रहम् पूर्णराते घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥ ४ ॥
धर्मे प्रीतिम् सन्मतिम् देवभक्तिम् सत्संगाप्तिम् देहि भुक्तिम् च मुक्तिम् ।
भावासक्तिम् चाखिलानन्दमूर्ते घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥ ५ ॥
श्लोकपंचकमेततद्यो लोकमङ्गलवर्धनम् ।
प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत् ॥ ६ ॥
इति श्रीमद्वासुदेवानन्दसरस्वतीविरचितं घोरकष्टोद्धरणस्तोत्रम् सम्पूर्णम् ॥
श्रावण महिना हा श्रवणभक्तीचा महिना असून या महिन्यामध्ये अधिकाधिक श्रवण, पठण, पूजन करण्याबाबत सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी श्रद्धावानांना सांगितलेच आहे. बापू त्यांच्या प्रवचनांमधून, अग्रलेखांमधून अनेक वेळा नामस्मरण, मन्त्र-स्तोत्रजप, आध्यात्मिक ग्रन्थपठण आणि सामूहिक उपासनेचे महत्त्वही स्पष्ट करतच असतात.
बापूंनी त्यांच्या 28 जुलै 2011 च्या मराठी प्रवचनात ‘श्रावण मासातील घोरकष्टोद्धरण स्तोत्र-पठणाचे महत्त्व’ या संदर्भात सांगितले. बापूंनी जे सांगितले त्याचा सारांश असा आहे -
‘सद्गुरूतत्त्वाएवढे प्रेम कोणीही करत नाही आणि करूही शकत नाही. प्रत्येकाची मर्यादा कितीही वाढत गेली, तरीही ती मर्यादितच आहे, पण फक्त तो परमेश्वरच एकमेव अमर्याद आहे. हे सद्गुरूतत्त्व कुठेही खंडित नाही, ते निर्गुण आहे, निराकार आहे, पण त्याचबरोबर ते पूर्ण चैतन्यमय आहे. घोरकष्टोद्धरण स्तोत्र हे साक्षात् श्रीगुरु दत्तात्रेयांचे स्तोत्र असून ते लिहिणारे साक्षात् श्रीवासुदेवानंदसरस्वती-स्वामीमहाराज आहेत. हे स्तोत्रदेखील पाच कडव्यांचे आहे, अगदी सहजपणे 108 वेळा पठण करता येईल असे आहे. अशा या प्रभावी स्तोत्राचे पठण आपण श्रावण मासात करतो.’
यावरून आमच्या लक्षात येते की या स्तोत्राचे पठण नित्य तर करावेच, पण पवित्र अशा श्रावण महिन्यात याचे सामूहिकरित्या 108 वेळा पठण करण्यावर बापूंनी भर दिला आहे, जे प्रत्येक श्रध्दावानास अनेक पटीने फल देणारे आहे.
सद्गुरूंच्या मार्गदर्शनानुसार श्रध्दावान खूप मोठ्या संख्येने संपूर्ण महिनाभर सामूहिक स्तोत्रपठणात मनापासून सहभागी होतात. बापूंनी सत्यप्रवेशमध्ये ‘यज्ञेन-दानेन-तपसा’ याबद्दल सांगितले आहे. त्यानुसार स्तोत्रपठणासह श्रद्धावान स्वेच्छेने अन्नपूर्णा प्रसादम् योजनेसाठी स्वेच्छेने धान्य आदि जिन्नसही अर्पण करतात. यंदा पठण काळात इच्छुक श्रद्धावान पुढील लिंकवर क्लिक करून अन्नपूर्णा महाप्रसादम् योजनेसाठी देणगी मूल्य देऊ शकतात.
या घोरकष्टोद्धरण स्तोत्राबद्दलची एक कथा सांगितली जाते, ती अशी - ‘शके 1833 मध्ये म्हणजेच सन 1911 मध्ये महान यतिवर्य श्रीवासुदेवानंदसरस्वती-स्वामीमहाराजांचा एकविसावा चातुर्मास कुरुगड्डी येथे संपन्न झाला. त्यावेळी त्यांच्या दर्शनास आलेल्या, स्वामीमहाराजांची दृढ भक्ती करणार्या एका भक्त गृहस्थांनी महाराजांकडे संततिप्राप्ती आणि कर्जमुक्ती यांसाठी प्रार्थना केली. अविलंबाने त्या गृहस्थांस महाराजांच्या कृपेने एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये झाली आणि त्यांच्यावरील कर्जही फिटले.
‘भक्तांच्या अभीष्ट मनोकामना पूर्ण व्हाव्या आणि कलियुगात भक्तांना येणार्या अडचणी दूर व्हाव्या, अखंड मंगलाची प्राप्ती व्हावी, आमचे कष्ट जसे दूर झाले, आम्ही जसे सुखी झालो आणि त्याचबरोबर अधिक भक्तिमानही झालो; तसे भक्तांचे कष्ट निवारण व्हावेत यासाठी एखादे स्तोत्र आपण लिहिल्यास सर्व भक्तांना त्याचा लाभ होईल’ अशी विनंती त्या भक्त गृहस्थांनी महाराजांना केली. करुणाहृदय श्रीवासुदेवानन्दसरस्वती-स्वामीमहाराजांनी त्या विनंतीस मान्य करून या घोरकष्टोद्धरण स्तोत्राची रचना केली.’
धन्य ते भक्त आणि धन्य श्रीमहाराज. पावन दत्तक्षेत्र नृसिंहवाडीस या स्तोत्राचे नित्य पठण केले जाते.
अशा या घोरकष्टोद्धरण स्तोत्राचे सामूहिक पठण दर वर्षी संस्थेतर्फे श्रावण महिन्यात आयोजित करण्यात येते. गुरुवारव्यतिरिक्त अन्य दिवशी सकाळी 9.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत व संध्याकाळी 5.30 ते रात्रौ 9.00 वाजेपर्यंत हे स्तोत्रपठण केले जाते; तर गुरुवारी सकाळी 9.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत व दुपारी 4.00 ते संध्याकाळी 7.00 वाजेपर्यंत हे स्तोत्रपठण केले जाते.
या स्तोत्राच्या शेवटच्या कडव्यात म्हटल्याप्रमाणे या स्तोत्राच्या पठणाने सद्धर्मप्रेम, सद्बुद्धी, ईशभक्ति, सत्संगती यांची प्राप्ती होते. मानवाच्या प्रापंचिक आणि पारमार्थिक इष्टकामनांची पूर्तता होते. भगवन्ताप्रतीचा प्रेमभाव, भगवन्ताविषयीची ओढ वाढविणारे असे हे स्तोत्र आहे. परम-आनन्दस्वरूप श्रीगुरु दत्तात्रेयांस नमन करून ‘घोरकष्टांमधून आमचा उद्धार कर’ अशी सादही त्यांना या स्तोत्रात घातली आहे.
या स्तोत्रात ‘श्लोकपंचकमेतद्यो लोकमंगलवर्धनम्। प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत्॥ असेही शेवटी म्हटले आहे, ज्याद्वारे आम्हाला उमगते की हे स्तोत्र जगताचे मंगल करणारे आहे. ‘या स्तोत्राचे निश्चयपूर्वक म्हणजे पूर्ण विश्वासाने पठण करणारा भक्त श्रीगुरु दत्तात्रेयांस प्रिय होतो’ असेही श्रीवासुदेवानन्दसरस्वती सांगतात. ‘श्रीगुरुंचा प्रिय होणे’ ही तर भक्तासाठी सर्वोच्च गोष्ट आहे.
श्रद्धावानांना त्यांच्या प्रापंचिक अडचणी सोडविणार्या, इष्टकामनांची पूर्ती करणार्या आणि पारमार्थिक प्रगतीही करणार्या अशा या प्रभावी दत्तस्तोत्राचे पठण करण्याची संधी सद्गुरू श्रीअनिरुद्धांमुळे मिळाली आहे.
भक्तीसह सेवेचे विविध पर्याय श्रद्धावानांना उपलब्ध करून देणार्या बापूंनी ए.ए.डी.एम.ची (अनिरुद्धाज् अॅकॅडमी ऑफ डिझॅस्टर मॅनेजमेंटची) स्थापनाच मुळी घोरकष्टोद्धरण स्तोत्राचे प्रात्यक्षिक (प्रॅक्टिकल) प्रॅक्टिकल म्हणून केलेली आहे.
घोरकष्टोद्धरण स्तोत्र सामूहिक पठण स्थळे
श्रीकृष्ण मंदिर सभागृह
सदानंद जाधव मार्ग, ऑफ एस् एस् वाघ मार्ग, चित्रा सिनेमा समोर, दादर पूर्व, मुंबई
त्रिविक्रम मठ - पुणे
सर्व्हे क्रमांक 11/2, प्लॉट नं 5, वर्धमान नगरी, कर्वेनगर, पुणे, महाराष्ट्र ४११०५२
त्रिविक्रम मठ - सांगली-मिरज
प्लॉट नंबर ११ सी, शिवगंगा पार्क, बोलवाड रोड, फोड्याजी लक्ष्मी मंदिर जवळ, मिरज, ४१६४१०
त्रिविक्रम मठ - मुंबई पश्चिम उपनगर
बंगला प्लॉट क्रमांक - २५३, आरसीएस-१ ए, गोराई रोड, बोरिवली वेस्ट, मुंबई, महाराष्ट्र ४०००९२
त्रिविक्रम मठ - रत्नागिरी
अतुलितबलधाम शांतीनगर, नाचने, रत्नागिरी, महाराष्ट्र ४१५६३९
त्रिविक्रम मठ - वडोदरा, गुजरात
सी ५४, निर्माण पार्क सोसायटी क्रमांक २, प्रमुख प्रसाद चौकडी आणि सन सिटी सर्कल जवळ, मंजलापूर, वडोदरा, गुजरात ३९००११