गुरुपौर्णिमा – अनिरुद्ध बापू भक्त प्रणिलसिंह टाकळे

गुरुपौर्णिमा... म्हटलं कि प्रत्येक श्रद्धावानांच्या मनात येते ते म्हणजे, आपल्या बापूंना, सद्गुरुंना डोळे भरून पाहणे, त्यांच्या गुरुकृपेमुळे आकंठ डुंबून अधिकाधिक त्यांच्या नामस्मरणात रममाण होण्याची सुवर्णसंधी अनुभवत आपल्या जीवनातील 'बापूंचे' गुरुस्थान अढळ करण्याचा सहज सोपा दिवस. प्रत्येकजण ज्याला जमेल त्याप्रमाणे बापूंवरील प्रेमापोटी आपली भक्ती-सेवेची फुले त्यांना अर्पण करतो.  
 श्री साईसच्चरितामधील एक ओवी प्रत्येक श्रद्धावान, बापूंचा झाला कि अगदी दररोज अनुभवत असतो.  

"काय गोड गुरुची शाळा, सुटला जनक जननीचा लळा।" 

खरंय, बापू तुमच्या निरनिराळ्या विषयांच्या पितृवचनांतील शिकवणीमुळे, कठीण वाटणाऱ्या पण सोप्या अनुभवातून अध्यात्माच्या पायऱ्या चढण्यापासून ते मनात कोणतीही उणीव/भीती न ठेवता थेट संवाद साधत राहून त्यातून वाट काढत मनावरचे ओझे नाहीसे केलेत. वरील ओवी म्हणजे माझ्यासाठी तुमच्या कोणत्याही सेवा कार्यात कार्यरत असताना इतर कसल्याही चिंता, नात्यांची किंवा अपेक्षांची ओढ मनात न राहता फक्त तुमच्या सेवेत आपला लहानसा का होईना पण भाग होऊन तुमच्या चरणी सर्व काही अर्पण करता येत राहणे, हेच प्रत्येकाचे ध्येय असते.

बापू.. मला आठवतंय, उपासनेला यायला जरी साल २००१ पासून सुरु झालं असलं तरी दहावी नंतर म्हणजे २००७ पासून श्रीहरिगुरुग्राममध्ये येऊन पितृवचन ऐकताना त्यातील मला काही कळतील असे मुद्दे लिहून काढायचो. त्यातही तुम्हीच सांगितल्याप्रमाणे आज जर मागे वळून पाहिल्यावर कळते कि आमची प्रगती कशी होत गेली, आध्यात्मिक प्रगती म्हणजे अनेक अशी स्तोत्रे, मंत्र, गजर आम्हांला तुमच्याशिवाय नक्कीच समजले नसते आणि बोलता ही आले नसते. मुख्य म्हणजे ह्या संपूर्ण प्रगतीचे श्रेय फक्त आणि फक्त बापू, तुमचेच आहे.  

माझ्या तसेच माझ्यासारख्या अनेकांच्या आयुष्यातील प्रत्येक चांगली सुधारणा, शिकवण इतकंच काय, तर कॉलेजपासून ते आता कॉर्पोरेट ऑफिसमध्येही आपला प्रेझेन्स कसा असावा, ह्याचा झालेला उपयोग आणि झालेली व पुढेही होणारी डेव्हलपमेंट सुद्धा तुम्हीच घडवलीत. अध्यात्माबरोबरच Hardcore Lifestyle Management चे महत्त्वदेखील तुम्हीच दाखवलेत.  

डॅड, दर गुरुपौर्णिमेला तुमच्या चरणी काय अर्पण करता येईल, हा प्रश्न असतोच. पण आम्हां सगळ्यांकडून ह्यादिवशी तुम्ही आमचे अर्धे पाप गुरुदक्षिणा म्हणून स्वीकारण्याची दिलेली ग्वाही आजही तशीच आहे आणि कायम अशीच राहील, हेच सर्व श्रद्धावानांसाठी भूषण आहे. माझे सद्गुरू बापू, माझ्यासाठी सर्वतोपरी झटून माझ्या जीवनातील अशी अनेक ओझी माझ्याही नकळत कमी करत राहतात.

मला माहित आहे, तुमच्या कृपाछायेत आम्हांला कसलीच झळ आजवर लागली नाही आणि ह्यापुढेही १०८% लागणार नाही. सद्गुरू बापू आणि गुरुपौर्णिमा ह्याविषयी लिहिताना कधीही शब्द कमीच पडतील.  

गुरु/शिक्षक  आपल्याला घडवतो पण सद्गुरू मला घडवताना, मी आहे तसं मला आपलंसं करतो आणि तेही सर्व गुण-दोषांसकट.  तुम्ही आम्हांला तुमच्या बरोबर घेतलंत आणि प्रत्येक क्षणी एकत्र असल्याची साक्ष देत राहता, ह्यातच आम्ही खूप तुमच्या चरणी अंबज्ञ आहोत..   

शेवटी एकच प्रार्थना... "अनिरुद्धा तुझा मी किती ऋणी झालो" 

- प्रणिलसिंह टाकळे 

Scroll to top