गुरूवचन – एक विश्वास असावा पूर्ता, कर्ता हर्ता गुरु ऐसा । – अनिरुद्ध बापू भक्त मनिषावीरा पाटील

अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य ‣ गुरूवचन - एक विश्वास असावा पूर्ता, कर्ता हर्ता गुरु ऐसा । - अनिरुद्ध बापू भक्त मनिषावीरा पाटील

गुरुवचनाचे जीवनात अनन्य साधारण महत्व आहे. सद्गुरु आणि सद्गुरूवचनावर विश्वास ठेवणे हीच खरी गुरुपुजा होय.

बापूंनी पितृवचनात दिलेले "एक विश्वास असावा पूर्ता, कर्ता हर्ता गुरु ऐसा ।" हे गुरुवचन म्हणजे अलभ्य लाभच आहे.

बापूंच्या ह्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवतो आणि श्रद्धावान संकटाच्या समुद्रात असला तरी सहजपणे तरुन जातो. जीवनात सर्वच गरजा महत्वाच्या आहेत. तसेच सद्गुरू माझ्या सोबत आहे, हा ठाम विश्वास आणि सद्गुरू वचन मला या आवश्यक गरजांपेक्षा ही जास्त देत असतात..

सदगुरू चरणी एकनिष्ठ राहून त्यांच्या वचनावर विश्वास ठेवावा. बापूंनी सांगितलेल्या भक्ती सेवेच्या माध्यमातून ह्या वचनाची पूर्तता होतच असते. जेंव्हा बापूंच्या ह्या वचनावर पूर्णपणे विश्वास ठेवतो तिथून मला अनुभव येण्यास सुरवात होते. दिशाहीन आयुष्य सुरु असते तेव्हा सदगुरू बापूंचे आयुष्यात येणे हे मला एक नवी दिशा प्राप्त होऊन एक आश्वासन मिळते.

सद्गुरुंचे येणे नव्हे ती सद्गुरू लीलाच असते की मला बापूनी स्वतःकडे घेतलेले असते. चुकीच्या मार्गावर चालत असताना सद्गुरू वचने मला पुन्हा सन्मार्गावर नेतात. बापुंपायी ठेवलेला एकविध भाव हाच मला एका विशिष्ट अश्या पैलतीरावर नेऊन पोचवत असतो...त्यांच्या मायेचं कृपाछत्र एवढे घट्ट असते की त्या मायेच्या मोहपाशातून माझी सुटका होतच नाही.

कारण एकमेव फक्त आणि फक्त सद्गुरू माझ्या जीवनाचे कर्ता करविता असतात. हा विश्वास गाठीशी असतो.

गुरुवचनावर विश्वास ठेवून त्यच्या आज्ञेप्रमाणे वागणे हेच श्रेयस्कर आहे. बिनधास्त सद्गुरुंवर भार सोपवून मी सुटकेचा निःश्वास घेत असेल ते तर फक्त या वचनामुळे की...

एक विश्वास असावा पूर्ता करता हर्ता गुरू ऐसा. 

- मनिषावीरा पाटील

Scroll to top