मातृवात्सल्यविंदानम् अर्थात मातरैश्वर्यवेदः
हा ग्रंथ म्हणजे श्रीगुरु दत्तात्रेय व परशुराम या गुरुशिष्यांच्या संवादामधून निर्माण झालेले आदिमाता चण्डिकेच्या त्रिधा स्वरूपाचे म्हणजेच आदिमाता गायत्री, आदिमाता महिषासुरमर्दिनी आणि आदिमाता अनसूया यांचे सोपे व सुलभ चरित्र.सद्गुरु श्रीअनिरुद्ध या ग्रंथाबद्दल लिहितात, "हा ग्रंथही आहे, हे गुणसंकीर्तनही आहे, ही ज्ञानगंगा आहे, ही भक्तिभागीरथीही आहे व आदिमातेचे आख्यान तर आहेच आहे. परंतू या सर्वांच्या पलिकडे हे माझ्या आदिमातेचे शुभंकरा व अशुभनाशिनी स्वरूप आहे, वात्सल्य आहे व वरदानही आहे."