सगळी कामापुरती नाती,
सोडूनी जाती सखे सोबती,
हात घट्ट पकडसी "तू" एकलाच,
कधी न टाकतोस बालकास ।।
श्रम करिता इवलेसेही,
"तू" प्रचंड आनंदी होसी,
चढता आम्ही अंबज्ञतेची शिडी,
देसी आम्हा "तू" भरभरूनी ।।
नाथसंविध् आम्हा शिदोरी,
दिली त्रि-नाथांनी धाडता भू-लोकी,
सक्रिय बाळांच्या आयुष्यात करूनी,
श्रीश्वास हा चाले संगे हात बाळांचा धरूनी ।।
पोहोचण्या भक्तिभाव चैतन्याचा मोठा खजिना,
दिलीस अंबज्ञतेची गुरूकिल्ली आणि नाथसंविध्- रूपी नकाशा,
प्रेमाची दावितो आम्हा सोपी वाट,
म्हणूनच हा त्रिविक्रम सर्व कारणांचा कारण असणारी सुंदर वहिवाट ||
लव्ह यु बाबा ❤️
- श्रध्दावान सुयशावीरा बापर्डेकर
लाईक, कमेंट व शेअर करण्यासाठी अनिरुद्ध प्रेमसागर श्रद्धावान नेटवर्कशी जोडुन घ्या.
या श्रद्धावान नेटवर्कवरील काही चांगल्या पोस्ट या ‘फिचर्ड पोस्ट‘ म्हणून निवडल्या जाणार आहेत.
अलीकडील पोस्ट
- ॐ शिवनारायणाय नम: – त्रिविक्रम अनंत नामवलीवर सद्गुरु अनिरुद्ध बापू यांचे प्रवचन – भाग १
- श्री हनुमान पौर्णिमा उत्सव
- ॐ हरिहराय नमः – त्रिविक्रम अनंत नामवलीवर सद्गुरु अनिरुद्ध बापू यांचे प्रवचन – भाग १०
- ॐ हरिहराय नमः – त्रिविक्रम अनंत नामवलीवर सद्गुरु अनिरुद्ध बापू यांचे प्रवचन – भाग ८
- ॐ हरिहराय नमः – त्रिविक्रम अनंत नामवलीवर सद्गुरु अनिरुद्ध बापू यांचे प्रवचन – भाग ९