आई जगदंबा व सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांच्या कृपाशिर्वादाने, आज दि. १६ मे २०१९ रोजी अतुलितबलधाम-रत्नागिरी येथे ‘त्रिविक्रम मठा’ची स्थापना करण्यात आली. ह्या त्रिविक्रम मठाकरिता शंख, ताम्हन, पीतांबर, तीर्थपात्र व तसबिरी गुरुवार दि. ९ मे २०१९ रोजी श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ येथून देण्यात आल्या होत्या. अत्यंत भक्तिमय, प्रसन्न व जल्लोषपूर्ण वातावरणात, संस्थेचे महाधर्मवर्मन डॉ. योगींद्रसिंह व डॉ. विशाखावीरा जोशी यांच्या हस्ते या आध्यात्मिक गोष्टी त्रिविक्रम मठासाठी श्रद्धावानांकडे सुपूर्द करण्यात आल्या होत्या. 

ह्या रत्नागिरी येथील त्रिविक्रम मठाच्या स्थापनेच्या वेळेस प्रार्थनेत मंगलाचरण, श्रीगुरुक्षेत्रम् मंत्र, श्रीरामरक्षा स्तोत्र, श्रीआदिमाता शुभंकरा स्तवनम्, त्रिविक्रम ध्यानमंत्र व त्रिविक्रम स्तोत्र, त्रिविक्रमाची १८ वचने आणि त्रिविक्रमाचा सार्वभौम मंत्रगजर घेण्यात आला. त्यानंतर उपस्थित श्रद्धावानांनी अनिरुद्ध ’भक्तिभाव चैतन्य’ चा अनुभव घेत विविध गजर करत जल्लोष केला. ह्या सोहळ्याची क्षणचित्रे आपण पुढील व्हिडिओ द्वारे पाहू शकतो. 

आता अनेक ठिकाणी उदा. जळगाव, औरंगाबाद, मिरज-सांगली, अमळनेर व बोरिवली (मुंबई) येथे त्रिविक्रम मठासाठी श्रद्धावानांचे जोरदार प्रयास सुरू झाले आहेत.

Scroll to top