महा रक्तदान शिबीर 2019

हरि ॐ,
दिलासा मेडिकल ट्रस्ट अ‍ॅन्ड रिहॅबिलीटेशन सेंटर द्वारा आयोजीत व श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन आणि अनिरुद्धाज्‌ अ‍ॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमानाने आज पार पडलेल्या महारक्तदान शिबीराचे हे २१ वे वर्ष होते. १९९९ साली डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी (सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध बापू) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झालेल्या या रक्तदान शिबीरांचे महाराष्ट्रभर आयोजन करण्यात येते. 
आज मुंबई व इतर ८ जिल्ह्यातील ३२ ठिकाणी रक्तदान शिबीर पार पडले. मुंबईत पार पडलेल्या महारक्तदान शिबीरात ३४ रक्तपेढ्या व त्याचबरोबर रक्तपेढ्यांतर्फे ८५ डॉक्टर्स, १७६ पॅरामेडिकल स्टाफ आणि ३०९ सपोर्ट स्टाफ उपस्थित होते; तसेच संस्थेतर्फे ५० डॉक्टर्स आणि इतर ७५ पॅरामेडिकल स्टाफ व एकूण १२०० श्रद्धावान कार्यकर्ते या भक्तिमय सेवेत सहभागी झाले. या महारक्तदान शिबीरात आज एकूण *६५३९* बाटल्या रक्त जमा झाले. तसेच महाराष्ट्रात इतर ठिकाणी झालेल्या शिबीरांमध्ये एकूण *२९६५* बाटल्या रक्त जमा झाले. त्यामुळे मागील २१ वर्षात झालेल्या रक्तदान शिबीरातील एकूण जमा झालेल्या बाटल्यांच्या संख्येने दीड लाखाचा टप्पाही यशस्वीपणे पार केला.

या भक्तिमय सेवेत सहभागी होऊन श्रद्धावान रक्तदात्यांनी व कार्यकर्ता सेवकांनी अनिरुध्द भक्तिभाव चैतन्याचा लाभ घेतला. रक्तदान शिबीरात सहभागी झालेल्या सर्व श्रद्धावानांचे व मागील काही महिन्यांपासून अथक परिश्रम करणार्‍या श्रद्धावान कार्यकर्ता सेवकांचे व डिजास्टर मॅनेजमेंट व्होलेंटियर्सचे (DMVs) प्रयास कौतुकास्पद आहेत. या सर्व श्रद्धावानांच्या सहकार्याने यापुढेही संस्थेची ही वाटचाल अशीच यशस्वीपणे होत राहो हीच सद्‍गुरु अनिरुद्धांच्या चरणी प्रार्थना.

। हरि ॐ । श्रीराम । अंबज्ञ । 
। नाथसंविध् ।
- समीरसिंह दत्तोपाध्ये
दिनांक - २१-०४-२०१९

प्रतिक्रिया व्यक्त करा

Scroll to top