अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य – ३१ डिसेंबर २०१९

२६ मे २०१३ रोजी आपण सर्वानी एक अद्‍भुत आणि सुखद प्रेमयात्रा अनुभवली, ती म्हणजे ’न्हाऊ तुझिया प्रेमे’. सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांच्या प्रेमात, या भक्तिभाव चैतन्यात नहाणं म्हणजे काय, याचा प्रत्यक्ष आणि पुरेपूर अनुभव त्या दिवशी श्रद्धावानांनी घेतला. आज या प्रेमयात्रेला ६ वर्षे पूर्ण होत आहेत आणि आपण सर्व श्रद्धावान ३१ डिसेंबर २०१९ रोजी होणार्‍या ’अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य’ या महासत्संगाची आतुरतेने वाट पहात आहोत.
या कार्यक्रमात कुठले अभंग सादर होतील याबद्दल प्रत्येक श्रद्धावानाच्या मनात कुतुहल असेलच. ह्या कार्यक्रमासाठी अभंग निवडणे म्हणजे अक्षरशः तारेवरची कसरत असते. कारण हे अभंग श्रद्धावानांनी आपापल्या जीवनात कधी ना कधी अनुभवले असतात, आणि ते ऐकताना आपण नकळत त्या क्षणांशी, त्या आठवणींशी जोडले जातो. म्हणून, मला भावलेला अभंग या कार्यक्रमात असावा असे प्रत्येक श्रद्धावानाला वाटते. यासाठीच या अभंगांच्या निवडप्रक्रियेत आपण सर्वांना सहभागी करून घेत आहोत.
यासाठी श्रद्धावानांनी ’अनिरुद्ध प्रेमसागरा - श्रद्धावान नेटवर्क’ या आपल्या सोशल मिडिया साईटवर लॉगिन करावे आणि त्या पेजवर दिलेल्या निर्देशांप्रमाणे या पोल मध्ये सहभागी व्हावे.
खरंच, ह्या अनिरुद्ध प्रेमसागराच्या लाटांवर आरूढ होऊन अनिरुद्धांच्या भक्तिभाव चैतन्यात सचैल न्हाऊन निघण्यासाठी हा कार्यक्रम म्हणजे सर्व श्रद्धावानांकरिता पर्वणीच असेल.
Scroll to top