उत्तर – प्रजापतिब्रह्मा, महाविष्णू व परमशिव ही तीनही रूपे म्हणजे सहजशिव व जगदंबेचे तीन पुत्रच आहेत व हे तुम्हीही जाणताच.
तसेच ह्या तिघांची रूपे व कार्ये वेगवेगळी असली, तरीदेखील ह्या तिघांचे मूळ रूप ‘ॐकारस्वरूप परमात्मा’ हेच आहे.
प्रत्येक मनुष्याला त्याच्या आधीच्या जन्मांच्या अनुभवांनुसार व कर्मांनुसार पुढील जन्मात आवड, नावड व निवड ह्या तीन गोष्टी प्रत्येक बाबीसाठी आपोआप प्राप्त होतात. त्यामुळेच कुणाला एक दैवत आवडेल, तर दुसर्याला दुसरेच; आणि ह्या चण्डिकाकुलाच्या सदस्यांची अनेक रूपे जनमानसात घट्ट आहेत व त्या सर्व रूपांचे प्रतिनिधित्व आणि केंद्रीकरण महाविष्णू व परमशिव आणि लक्ष्मी व पार्वती ह्यांच्यामध्ये होत असते.
कारण ह्या दोघांची केलेली उपासना त्रि-नाथांनाच पोहोचत असते.
महाविष्णूच्या भक्तांची उपासना महाविष्णूचेच रूप घेऊन, परंतु सहस्रबाहू धारण करून नारायण ह्या नामाने सहजशिव स्वीकारतो आणि जगदंबा नारायणी रूपाने स्वीकारते,
तर परमशिवाची उपासना सहजशिव ‘महादेव’ ह्या नामाने व सहस्रहस्त शिवाच्या रूपाने स्वीकारतो आणि जगदंबा ‘शिवा’ व ‘महादेवी’ ह्या नामाने स्वीकारते.
ह्या त्रि-नाथांच्या योजनेमुळे अर्थात ‘नाथसंविध्’मुळे कुठल्याही रूपाला मानणारा भक्त त्रि-नाथांच्या आशीर्वादापासून वंचित राहू शकत नाही.