३३) श्रद्धावानाला भजन, पूजन, अर्चन, हवन, तीर्थयात्रा, व्रते इ. उपचारांची आवश्यकता का आहे?

उत्तर – मानवाचे मन जरी भगवत्परायण झाले तरीही जोपर्यंत त्याला शरीराची साथ मिळत नाही, तोपर्यंत मन निश्चल बनू शकत नाही आणि चंचल मनाला सतत भगवत्परायण राहणे जमू शकत नाही. आणि म्हणूनच जेथे जेथे मन चंचल व दुर्बल बनू शकते, तेथे तेथे वरील प्रकारच्या उपासना शरीर व बुद्धीला मनाशी बांधून ठेवतात. पूजनादि सर्व बाह्योपचार म्हणजे मानवाच्या प्राणमय देहातील ऊर्जाकेंद्र समर्थ करण्याचे व शुद्ध करण्याचे विविध मार्ग.
जोपर्यंत देह आहे, तोपर्यंत श्रद्धावानाला भजन, पूजन, अर्चन, हवन, तीर्थयात्रा, व्रते इ. बाह्योपचारांची आवश्यकता आहेच.

Scroll to top