THE DEVOTION SENTIENCE (BHAKTIBHAV CHAITANYA)
means entrusting myself with love to the Swayambhagwan Trivikram (The Supreme Personality of Godhead), and cherishing the consciousness and awareness that He is with me always, every moment certainly. Which in fact The Bhagwatdnyan– true knowledge about the Bhagwanta and The Bhagwatbhaan – true awareness and consciousness about the Bhagwanta and His active presence in my life
अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य लेटेस्ट पोस्ट
ॐ शिवनारायणाय नम: – त्रिविक्रम अनंत नामवलीवर सद्गुरु अनिरुद्ध बापू यांचे प्रवचन – भाग १
श्री हनुमान पौर्णिमा उत्सव
ॐ हरिहराय नमः – त्रिविक्रम अनंत नामवलीवर सद्गुरु अनिरुद्ध बापू यांचे प्रवचन – भाग १०
ॐ हरिहराय नमः – त्रिविक्रम अनंत नामवलीवर सद्गुरु अनिरुद्ध बापू यांचे प्रवचन – भाग ८
ॐ हरिहराय नमः – त्रिविक्रम अनंत नामवलीवर सद्गुरु अनिरुद्ध बापू यांचे प्रवचन – भाग ९
नव वर्षाचे प्रवचन – सद्गुरु अनिरुद्ध बापू | ११ जानेवारी २०२४
ॐ हरिहराय नमः – त्रिविक्रम अनंत नामवलीवर सद्गुरु अनिरुद्ध बापू यांचे प्रवचन – भाग ७
सच्चिदानंदोत्सव
ॐ हरिहराय नमः – त्रिविक्रम अनंत नामवलीवर सद्गुरु अनिरुद्ध बापू यांचे प्रवचन – भाग ६
धनत्रयोदशी – श्री धनलक्ष्मी श्रीयंत्र पूजन
सदगुरु श्री अनिरुद्ध बापू यांच्याबद्दल
‘अध्यात्म’
हा शब्द ऐकल्यावर बरेचदा सर्वसामान्य मानवाची स्थिती ‘साधासुधा जीव अध्यात्म कळेना, घाबरून राही दूर दूर’ अशी होते. सामान्य मानवाच्या मनातील अध्यात्मविषयक भय दूर करून, भक्तीबद्दलचे गैरसमज दूर करून, ‘भगवंताच्या भक्तिभाव चैतन्यात राहून प्रत्येक जण भगवंताचे सामीप्य प्राप्त करू शकतो’ हा विश्वास दृढ करण्याचे आणि सहजसोप्या शब्दांत भक्तिविषयक मार्गदर्शन करण्याचे कार्य सद्गुरु श्रीअनिरुद्ध (बापू) आपल्या वाणीने, लेखणीने, आचरणाने करत आहेत.
सद्गुरु श्री अनिरुद्ध (बापू) स्वत: डॉक्टर (एम. डी. - मेडिसीन, हृमॅटॉलॉजिस्ट) असून त्यांचे कुटुंबीयही सायन्सच्या विविध विषयांतील उच्चशिक्षित पदवीधर आहेत. सद्गुरु श्री अनिरुद्ध (बापू) त्यांच्या प्रवचनात विज्ञानाचे, शास्त्रज्ञांचे अनेक संदर्भ देत असतात.
परमेश्वर दत्तगुरु आणि आदिमाता जगदंबा यांच्या भक्तिभाव चैतन्यात सदैव असणर्या सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापुंनी (डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी) इसवीसन १९९६ पासून विष्णुसहस्रनाम, ललितासहस्रनाम, राधासहस्रनाम, रामरक्षा, श्रीसाईसच्चरित अशा अनेक महत्वाच्या विषयांवर प्रवचने देण्यास सुरुवात केली. जगभरातील असंख्य श्रद्धावानांसाठी बापू सद्गुरुस्थानी आहेत. स्वत: एक आदर्श गृहस्थाश्रमी असणारे बापू प्रपंचात राहून परमार्थ साधता येतो, हे स्वत:च्या आचरणातून शिकवतात.
सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या जीवनप्रवासात एक गोष्ट ‘नित्य’, ‘शाश्वत’ आहे, ते म्हणजे बापू आणि बापूंचे लाभेवीण प्रेम. या लाभेवीण प्रेमातूनच बापुंनी आपल्या श्रद्धावान मित्रांसाठी ‘स्वस्तिक्षेम तपश्चर्या’ केली.
आध्यात्मिक आधार बळकट होण्याकरिता मानवाने नियमितपणे उपासना करत राहणे आवश्यक असते, पण सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मागे लागलेल्या सततच्या विवंचनांमुळे प्रत्येकाकडून त्या उपासना नित्यनियमितपणे होतातच असे नाही.
आपल्या श्रद्धावान मित्रांच्या जीवनातील ही कमतरता जाणून, ती उणीव भरून काढण्यासाठी सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी सन २०११ च्या आश्विन नवरात्रीच्या प्रारंभापासून म्हणजेच २८ सप्टेंबर २०११ पासून स्वस्तिक्षेम तपश्चर्येस प्रारंभ केला.
भक्तिभाव चैतन्याबद्द्ल जाणून घ्यायचेय?
अधिक वाचा
भक्तिभाव चैतन्यात मी काय संपादन करु शकतो?
अधिक वाचा
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
भक्तिभाव चैतन्याबद्दल प्रश्न-उत्तर