ना मी ओळखले स्वतःला मग, मी कसा ओळखू देवा तुला।
ओळख जरी खूपच जुनी आपली, तरी मी विसरलो तुला क्षणाक्षणाला।।
कामा पुरती  जवळ येतो अन, काम होताची लांब सरकतो।
कृतघ्नतेचे झापड लावून, तुझ्यापासुनी दूर मी पळतो।।
वृत्तींच्या चिखलात मनमुराद लोळूनी, मौज विलास यातची रमतो।
नाम ध्यान यात चित्त न रमता, जीवन मीच अंधारून टाकतो।।
आयुष्याची गणिते मग चुकू लागता, तुझ्या कृपे बुद्धी ताळ्यावर येते।
तोडकी मोडकी भक्ती करू लागता, आनंदे माय उल्हासीत होते।।
कधी प्रेम तर कधी धाकाने, तुच आम्हाला जवळ खेचतो।
प्रेमाचे अवीटगोड अमृतबोल पाजून, जीवन आमचे मधुर बनवतो।।
तू भक्तसखा अगदी वेगळा, मनाच्या आंधळेपणा लाव भावभक्तीचा डोळा।
भक्तिभाव चैतन्यात चीत्त रमवण्या, आला त्रिविक्रम अनिरुद्ध राम सावळा।।
अंजलीवीरा गुरव (अंधेरी पूर्व)

लाईक, कमेंट व शेअर करण्यासाठी अनिरुद्ध प्रेमसागर श्रद्धावान नेटवर्कशी जोडुन घ्या.

या श्रद्धावान नेटवर्कवरील काही चांगल्या पोस्ट या ‘फिचर्ड पोस्ट‘ म्हणून निवडल्या जाणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Scroll to top