श्रीमहादुर्गेश्‍वर प्रपत्ती

सद्‍गुरु श्रीअनिरुध्दांनी सन 2010 मध्ये त्यांच्या रामराज्यविषयीच्या प्रवचनात प्रपत्ती करण्यासंदर्भात सांगितले होते. त्यावेळेस बापू म्हणाले की ‘प्रपत्ती’ या शब्दाचा सरलार्थ म्हणजे शरणागती, जी आपत्तीला, संकटाला किंवा दुर्दैवाला टाळते. शरणागती म्हणजे स्वत:ला आदिमाता चण्डिका आणि तिचा पुत्र त्रिविक्रम ह्यांच्या स्वाधीन करणे.
प्रपत्ती प्रत्येक स्त्री व पुरुषाला प्रापंचिक आणि आध्यात्मिक पातळीवर शूर सैनिक बनविते असेही बापूंनी सांगितले होते. बापूंच्या मार्गदर्शनानुसार श्रावण महिन्याच्या सोमवारी श्रध्दावान पुरुष एकत्र येऊन श्रीमहादुर्गेश्‍वर प्रपत्ती करतात.

श्रीमहादुर्गेश्वर -

श्री गुरुक्षेत्रममध्ये महादुर्गेश्वराचे लिंगाचे दर्शन सर्वांना घेता येते. महादुर्गेश्वर म्हणजेच महिषासुर्दिनी आदीमाता चण्डिका. ते एकही आहेत आणि नाहीही. गुरुक्षेत्रममध्ये या महादुर्गेश्वराचे दररोज तीन प्रहरी पूजन केले जाते. तर दर महिन्याच्या शिवरात्रीला देखील महादुर्गेश्वराचे शिवरात्री पूजन केले जाते.

श्रीमहादुर्गेश्वर प्रपत्ती -

श्रावणातील कुठल्याही सोमवारी किंवा सर्वच्या सर्व सोमवारी ही श्री महादुर्गेश्वर प्रपत्ती केली जाते. स्त्रिया व पुरुषांची ग्रहणक्षमता भिन्न भिन्न आहेत. तो निसर्गानेच केलेला बदल आहे. त्यामुळे पुरुषांना चार सोमवार तर स्त्रियांना एका मकर संक्रांतीच्या दिवशी प्रपत्ती दिली गेली आहे. श्रावणी सोमवारी शिवशंकराबरोबर नृसिंह अवतारच्या पूजेचाही मान असतो. बापू त्यांच्या रामराज्याच्या प्रवचनात म्हणतात की प्रत्येक पुरुषाची त्रिविक्रम हाच नृसिंह आहे ही श्रद्धा असली पाहिजे. या त्रिविक्रमाच्या प्रतिमेचे पूजन महादुर्गेश्वर प्रपत्तीमध्ये केले जाते.

या प्रपत्तीसमयी ‘बम् बम् भोलेनाथ बम् बम् भोले’ हा घोष करत श्रद्धावान पुरुष प्रदक्षिणा करतात. सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांनी 10 मार्च 2016 रोजीच्या प्रवचनात या संदर्भात श्रद्धावानांना माहिती दिली. ‘बम् हे बीज ब्रह्मबीज म्हटले जाते, बलबीज, ब्रह्मबीज, बृहद्बीज, बुद्धिबीज म्हटले जाते, विकासाचे बीज म्हटले जाते. ‘बम्’ हे मूलत: पुरुषबीज असून ते भगवन्ताच्या अनुग्रहाचेही बीज आहे म्हणून स्त्रियाही ‘बम् बम् भोलेनाथ बम् बम् भोले’ म्हणू शकतात.

या कलियुगात कोणाही मनुष्याच्या खर्‍या रूपास जाणणे कठीण असते, प्रारब्ध पुढे काय काळ आणेल हे समजणेही अशक्यप्रायच आहे आणि आपत्कालीन परिस्थितीत निर्णय घेणे तर त्याहून कठीण असते. अशा वेळी माझी सहाय्यता करणारा, मला आवश्यक ते बल देण्यास तत्पर असणारा, बम् हे बीज असणारा भोळा शिव आहे आणि या भोलेनाथाचे, भोळ्यांच्या नाथांचे, भोळ्या शिवाचे स्मरण ‘बम् बम् भोलेनाथ बम् बम् भोले’ म्हणत केले जाते.

श्रीमहादुर्गेश्वर प्रपत्ती कशी करावी?

श्रद्धावान पुरुषांनी एकत्र येऊन सूर्यास्तानंतर ही प्रपत्ती करावी. श्रद्धावानाच्या वेषात ही प्रपत्ती करावयाची आहे. ५ वेळा श्री गुरुक्षेत्रम मंत्राने सुरुवात केल्यानंतर त्यानंतर महादुर्गेश्वराचा जप ११ वेळा घ्यायचा आहे. त्यानंतर महादुर्गेश्वराची बल कथेचे वाचन करायचे आहे. अतीशय सुंदर अशी कथा ही आहे. सर्वप्रकारच्या बलचे प्रदान करणारी ही कथा आहे. त्यानंतर गौरीहराची आरती घ्यायची आहे. त्यानंतर हातात तबक घेऊन मांडणीच्या १२ प्रदक्षिणा "बम बम भोलेनाथ" या गजरासकट घालावयाच्या आहेत. हे "बं" बीज विकास चे बीज आहे, बलच बीज आहे, अनुग्रहाचे बीज आहे आणि याची शास्ता कोण आहेत तर बलगंगागौरी म्हणजे शिवगंगागौरी. त्यानंतर त्रिविक्रमाला पांढरी, पिवळी फूले अर्पण करावयाची आहे. या प्रपत्तीची अधिक माहीती श्री महादुर्गेश्वर प्रपत्तीच्या पुस्तकात मिळू शकेल.

ह्या प्रपत्तीमधील दोन महत्त्वाची अंगं आहेत, ‘श्री महादुर्गेश्‍वर प्रपत्ती कथा’ व ‘द्वादश ज्योतिर्लिंग आरती’. काही वयस्कर व बहुभाषिक श्रद्धावानांना ही कथा वाचण्यास तसेच आरती म्हणण्यास येत असणार्‍या अडचणी जाणून बापूंच्या मार्गदर्शनानुसार प्रपत्तीच्या वेळी अशा श्रद्धावानांच्या कुटुंबातील स्त्री व्यक्तीची, उदा. आई, पत्नी, बहीण किंवा इतर कोणत्याही स्त्रीव्यक्तीची कथा वाचण्यासाठी अथवा आरती म्हणण्यासाठी मदत घेतली जाऊ शकते.’ संदर्भ 

ही प्रपत्ती सूर्यास्तानंतर केली जात असल्याने ‘जर या प्रपत्तीच्या दिवशी चन्द्रग्रहण आले तर काय करावे’ असा प्रश्‍न 2017 सालच्या श्रावण मासात श्रद्धावानांसमोर आला होता. त्यावेळी बापूंच्या मार्गदर्शनानुसार सुर्यास्तानंतर परंतु चंद्रग्रहणाच्या पर्वकाळापूर्वी प्रपत्ती करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.
संदर्भ

प्रतिक्रिया व्यक्त करा

Scroll to top