आज स.7:30 ला ब्रम्हांड हून वसंत विहारला शाळेत मुलाला Athletics च्या क्लास हून आणायला जात होते. रिक्षा मानपाडयाला उजवीकडे वळणारच होती .तितक्यात रिक्षा वाल्याने जोरात ब्रेक मारला आणि रिक्षा पुढच्या गाडीवर धडकली. रिक्षाचा head light तुटला. त्या धडकेने मी पुढे वाकायला गेले आणि त्याच वेगाने पाठी होऊन, सीटच्या मागे पाठ आपटली गेली.
एखाद्याने जोरात पाठीवर लाथ मारावी तशी पाठ दुखायला लागली आणि छातीत धडधडायला लागल. रिक्षाचालक खाली उतरला. काय झाल पहायला मी रिक्षा बाहेर डोकावल. तर वेगात आलेल्या अवाढव्य TMT Bus ने आमच्या रिक्षाला ठोकल होत. रिक्शाच मागच बंपर पूर्ण चेपल.बस रिक्शाला अक्षरशः चिकटून उभी होती.
हाताच्या अंतरावर बसच चाक होत.मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मंत्रगजर करायची सवय आहे. बरोबर counter घेत प्रवासात गजर करते. ही धडक बसली तेव्हाही हातात counter होते. मी मंत्रगजर करत होते. जर आमची रिक्षा टर्न घेत असती तर रिक्षा आणि बस काटकोनात असते आणि बसचे चाक उजव्या बाजूने रिक्षात घुसले असते.
पुढे जे झाले असते त्याची कल्पना न केलेली बरी. पण त्रिविक्रम मंत्रगजराने माझे प्राण वाचवले. खरच बापू माझ्या आयुष्यात आले आणि सर्वच बदलले. इतक होऊनही त्या वेळी माझ डोक शांत होत. कारण सगळ लक्ष गजराकडे होत. चंडिकाकूल,त्रिविक्रम बाप्पा आणि बापू ,आई ,दादा खूप खूप
अंबज्ञ. श्रीराम. अंबज्ञ. नाथसंविध.
- अजितावीरा कुळकर्णी .
26.4.2019
लाईक, कमेंट व शेअर करण्यासाठी अनिरुद्ध प्रेमसागर श्रद्धावान नेटवर्कशी जोडुन घ्या.
या श्रद्धावान नेटवर्कवरील काही चांगल्या पोस्ट या ‘फिचर्ड पोस्ट‘ म्हणून निवडल्या जाणार आहेत.
अलीकडील पोस्ट
- धनत्रयोदशी – श्री धनलक्ष्मी श्रीयंत्र पूजन
- गोवत्सद्वादशी – वसुबारस
- Shree Krupachaitanya Paduka Pravachan | Aniruddha Bapu Pravachan (Marathi) | 02nd Nov 2023
- Om Hariharaya Namah – Imp Announcement | Aniruddha Bapu Pravachan(Marathi)| Harigurudas/Harigurudasi
- Om Hariharaya Namah – Pravachan by Sadguru Aniruddha Bapu (Marathi) on Trivikram Anant Namavali