भक्ती आणि विज्ञान यांच्या परस्परपूरक उपयोगाद्वारे विश्वकल्याणाचा, मानवकल्याणाचा मार्ग उद्घाटित होतो,
हे स्पष्ट करून सांगताना दैनिक ‘प्रत्यक्ष’मध्ये दिनांक १६-१२-२००५ रोजी प्रकाशित झालेल्या ‘आजची गरज’ या अग्रलेखात सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू लिहितात -
‘विज्ञान व भक्ती एकमेकाला कधीही मारक तर ठरणार नाहीतच, उलट विज्ञानाच्या समृद्धीने भक्तिवैभवात भरच पडेल आणि भक्तिसामर्थ्याने विज्ञानाची संहारक शक्ती दुर्बळ होऊन विधायक आविष्कार अधिकाधिक बलवान होईल.
विज्ञानाच्या सहाय्याने भक्तिक्षेत्रातील चुकीच्या समजुती व कल्पना नाहीशा होतील आणि भक्तीच्या आधाराने विज्ञानाचा गैरवापर थांबवता येईल.
आधुनिक संहारक शस्त्रे एका क्षणात सामूहिक संहार करतात, म्हणून त्यांच्या प्रतिकारासाठी आपल्याला सामूहिक सहयोग, सामूहिक प्रेम आणि सामूहिक सहजीवनाची कला शिकावी लागेल आणि अशी अहिंस्त्र सामूहिक शक्ती फक्त वैयक्तिक व सामूहिक भक्तीतूनच उत्पन्न होणार आहे.’
विज्ञान आणि अध्यात्म या दोन्ही शास्त्रांनी मांडलेल्या ‘शक्तिमय विश्व’ या संकल्पनेस स्पष्ट करताना श्रीमद्पुरुषार्थ ग्रन्थराज प्रथम खण्ड सत्यप्रवेश मध्ये सद्गुरु श्री अनिरुद्ध म्हणतात -
‘शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केले आहे की ह्या प्रोटॉन्सचे (Protons) व इलेक्ट्रॉन्सचे (Electrons) अधिकाधिक विभाजन करीत गेले असता, शेवटी फक्त ‘चिद्अणू’ अथवा Monads उरतात (शक्तीचे पुंजके) व हे चिद्अणू उत्पन्न होत नाहीत किंवा नष्टही होत नाहीत. सर्व विश्व म्हणजे ह्या चिद्अणूंचा म्हणजेच शक्तिबिंदूंचा अविनाशी पसारा आहे,
आणि म्हणूनच सर्व विश्वावर, अगदी लोखंड, लाकूड, दगडापासून मानवापर्यंत सर्वत्र ह्या मूळ शक्तीचेच सूत्र कार्यरत आहे आणि हे सूत्र ज्याचे, तोच तो भगवंत.’
त्याचप्रमाणे दैनिक प्रत्यक्ष तुलसीपत्र अग्रलेखमालिका अग्रलेख क्र. १६१० (दिनांक १४-०३-२०१९) मध्ये
विज्ञान आणि अध्यात्म दोन्ही शास्त्रांना मान्य असणार्या ‘विश्वाची स्पन्दरूप शक्तिमयता’
याबद्दल बापुंनी लिहिले आहे.
सद्गुरु श्री अनिरुद्ध (बापू) स्वत: डॉक्टर (एम. डी. - मेडिसीन, हृमॅटॉलॉजिस्ट) असून .
त्यांचे कुटुंबीयही सायन्सच्या विविध विषयांतील उच्चशिक्षित पदवीधर आहेत.
सद्गुरु श्री अनिरुद्ध (बापू) त्यांच्या प्रवचनात विज्ञानाचे, शास्त्रज्ञांचे अनेक संदर्भ देत असतात.
विश्वविख्यात शास्त्रज्ञ निकोल टेसला आणि त्यांचे संशोधन कार्य यांच्याबाबत श्रीहरिगुरुग्राम येथे २७ मार्च २०१४ रोजीच्या प्रवचनात बापुंनी सविस्तर माहिती दिली व त्यांच्याच मार्गदर्शनानुसार दैनिक प्रत्यक्षमध्ये निकोल टेसला यांच्या संशोधन कार्याविषयीची लेखमाला प्रकाशित करण्यात आली.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाला अनुसरून असणार्या विविध विषयांवर स्वत: बापुंनी सेमिनार्स घेऊन नॅनो टेक्नॉलॉजी, क्लाऊड काँप्युटिंग, स्वार्म इंटेलिजन्स अशा अनेक नविन विषयांची ओळख आपल्या श्रद्धावान मित्रांना करून दिली.
तसेच डॉ. अनिरुद्ध जोशी यांनी आपल्या २५ वर्षाचा प्रदिर्घ वैद्यकिय अनुभवावरून समाजासाठी ’सेल्फ हेल्थ’ या विषयावर ’अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स’ येथे १३ डिसेंबर २०१४ मध्ये सेमीनार घेतला, ज्याला असंख्य जनसमुदाय उपस्थित होते.
श्रीमद्पुरुषार्थ ग्रन्थराज तृतीय खंड आनंदसाधना यात बापू लिहितात -