उत्तर – भगवान त्रिविक्रम आपल्या भक्तांना कृतघ्नतेचे पाप लागू नये म्हणून त्यांच्याकडून आभार किंवा भेट स्वीकारत नाही. त्रिविक्रमाला फक्त आभार मानणे नको असते. कारण मग नियमानुसार त्या भक्ताकडे आभाराच्या बदल्यात तेवढे पुण्य येते व श्रद्धावान आभार मानावयास विसरला, तर तेवढे पाप येऊ शकते
आणि असे पाप आपल्या भक्तांकडे जावे हे त्रिविक्रमाला कधीच आवडणार नाही.
म्हणूनच त्रिविक्रमाला जे द्यायचे, अर्पण करावयाचे ते फक्त प्रेमाने व श्रद्धेने करा, नवस पूर्ण करण्यासाठीसुद्धा करा; परंतु आभार (Thanks) म्हणून नाही, तर फक्त प्रेमाने.
श्रद्धावानाने त्रिविक्रमाला प्रेमाने सर्वकाही देत रहावे. फक्त त्याचे आभार न मानता, त्याऐवजी ‘माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे’ असे सांगत रहावे.
कारण प्रेम, श्रद्धा, भक्ती, निष्ठा व विश्वास हेच पंचोपचार त्रिविक्रमाला सर्वांत प्रिय आहेत.