२४) स्वयंभगवान त्रिविक्रमास ‘श्रद्धावानांचा कैवारी’ असे का म्हटले जाते?

उत्तर – जेव्हा जेव्हा श्रद्धावान विरुद्ध श्रद्धाहीन अशी परिस्थिती असते, तेव्हा तेव्हा श्रीत्रिविक्रम हा फक्त श्रद्धावानांनाच सहाय्य करीत असतो.

परंतु जेव्हा श्रद्धाहीनांमध्येच अंतर्गत संघर्ष सुरू होतो, तेव्हा हाच श्रीत्रिविक्रम त्यांच्यामधील जो गट केवळ अज्ञानामुळे श्रद्धाहीन बनलेला आहे, त्याच्या पाठीशी उभा राहतो व आधी त्यांना श्रद्धावान बनवून मग त्यांना विजयी करतो.

अशा प्रकारे श्रीत्रिविक्रम केवळ श्रद्धावानांनाच विजयी करीत असतो. म्हणूनच त्याला ‘श्रद्धावानांचा कैवारी’ म्हटले जाते.

Scroll to top