३१) ’मी’ स्वयंभगवानाचा अंश आहे अर्थात माझा जीवात्मा त्या स्वयंभगवानाचाच एक अंश आहे आणि ’स्वयंभगवान’ अंशी आहे म्हणजे नक्की काय?

उत्तर – समुद्र आणि समुद्रातील एक थेंब ह्याच्यामधील नाते म्हणजेच स्वयंभगवान आणि प्रत्येक मानव ह्यांच्यामधील नाते.
रासायनिकदृष्ट्या समुद्राचे जल व त्या जलाचा वेगळा झालेला थेंब ह्यांच्यामध्ये काहीच फरक नाही अर्थात अभेद आहे. परंतु अख्ख्या समुद्राचे सामर्थ्य आणि त्या वेगळ्या पडलेल्या थेंबाचे सामर्थ्य ह्यांच्यामध्ये तुलना होऊ शकत नाही.

Scroll to top