उत्तर – सच्चिदानंद अर्थात सत्, चित्, आनंद स्वरूप असणार्या परमेश्वर दत्तगुरु, आदिपिता सहजशिव नारायण व आदिमाता जगदंबा नारायणी ह्या त्रि-नाथांचा सर्व विश्वाला व्यापणारा व भक्तांच्या जीवनात सर्वत्र भरून राहणारा ‘जिवंत आनंद’ म्हणजेच स्वयंभगवान, अर्थात त्रि-नाथांचा आनंद म्हणजेच त्रिविक्रम.
त्रिविक्रम हा त्रि-नाथांमधील परमेश्वरी प्रेमसेतु आहे.
‘त्रिविक्रम’ आणि ‘स्वयंभगवान’ हे दोन शब्द एकरूपच आहेत.