रत्नागिरी-महाराष्ट्र येथे त्रिविक्रम मठाची स्थापना
- समिरसिंह दत्तोपाध्ये
।। हरि ॐ ।।
रत्नागिरी-महाराष्ट्र येथे त्रिविक्रम मठाची स्थापना
आदिमाता जगदंबेच्या (मोठ्या आईच्या) कृपेने आणि सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या आशीर्वादाने रत्नागिरी, महाराष्ट्र येथे त्रिविक्रम मठाची स्थापना गुरुवार, दिनांक १६ मे २०१९ रोजी करण्यात येणार आहे. ह्या त्रिविक्रम मठाकरिता शंख, ताम्हन, पीतांबर, तीर्थपात्र आणि तसबिरी आज गुरुवार, दिनांक ०९ मे २०१९ रोजी श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्मध्ये संस्थेचे महाधर्मवर्मन् डॉ. योगींद्रसिंह जोशी व डॉ. विशाखावीरा जोशी ह्यांच्या हस्ते श्रद्धावानांकडे सुपूर्त करण्यात आल्या.
श्रद्धावान अतिशय प्रसन्नतेने व हर्षोल्हासासहित, भक्तिभाव चैतन्यमय वातावरणात सहभागी झाले होते. या समारंभात सहभागी झालेल्या श्रद्धावानांनी श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रममध्ये स्वयंभगवान श्रीत्रिविक्रमाचा सार्वभौम मंत्रगजर व अन्य गजर गात-नाचत आनंद केला.
ll हरि ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञ ll
॥ नाथसंविध् ॥