Discourse of Sadguru Shree Aniruddha

(Thursday. 9th February 2023)

Sadguru Aniruddha Bapu began his discourse on 9th Feb 2023 by giving best wishes to all Shraddhavaan students appearing for standard 10th and 12th. Bapu spoke about how we always believe the problem at hand is overwhelming; what is most important is not how we react but respond to the situation and in life, everything depends on it.

Sadguru Bapu said that it was alright to fight with God, but who He is, is something we need to always bear in our minds. Also, he explained why we needed to not be afraid of God but be in awe of Him. Sadguru Bapu sincerely told everyone that the Trivikram loves all and also explained having conviction, of which three things meant having faith.

Bapu explained with his example that scoring more or less in exams when we have studied is also caused by the Parmeshwar only for our best. Bapu said the Vedas have described God as 'Anorniyaan mahato mahiyaan' (अणोरणीयान् महतो महीयान्) and explained its meaning.

In the end, he told everyone the kind of mindset we need to have before, during and after exams. Moreover, Bapu assured that 'be sure he (Trivikram) is with you' and that Bapu never forsakes anyone who truly accepts Bapu as his own.

सदगुरु अनिरुद्ध बापूंनी ९ फेब्रुवारी २०२३ रोजी इयत्ता १० वी आणि १२ वीला बसलेल्या सर्व श्रद्धावान विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन प्रवचनाला सुरुवात केली. बापूंनी आपल्याला नेहमी समोर ठाकलेली समस्या कशी खूप मोठी वाटत असते ह्यावर बोलले; आपण परिस्थितीला कशी प्रतिक्रिया देतो हे सर्वात महत्त्वाचे नसून आपण त्याला दिलेला प्रतिसाद असतो आणि जीवनात, सर्वकाही त्यावर अवलंबून असते.

सद्गुरु बापू म्हणाले की देवाशी भांडायला हरकत नाही, पण तो देव आहे हे विसरून चालणार नाही. तसेच, आपण देवाला घाबरायची गरज नसून, त्याचा धाक बाळगायची का गरज आहे हे त्यांनी स्पष्ट केले. सद्गुरु बापूंनी सर्वांना मनापासून सांगितले की त्रिविक्रम सर्वांवर कसा प्रेम करतो आणि विश्वास असणे म्हणजे कुठल्या तीन गोष्टींची खात्री असणे हे देखील त्यांनी स्पष्ट केले.

बापूंनी स्वतःच्या उदाहरणाने दाखवून दिलय कि आम्ही अभ्यास केला असताना इतके मार्क जास्ती आणि इतके मार्क कमी हे सुद्धा परमेश्वर आमच्या भल्या साठीच करत असतो. बापू म्हणाले की वेदांनी देवाचे वर्णन 'अनोर्णियां महतो महियान्' असे केले आहे आणि त्याचा अर्थ त्यांनी स्पष्ट केला.

शेवटी, परीक्षेपूर्वी, दरम्यान आणि नंतर आपण कोणत्या प्रकारची मानसिकता (mindset) ठेवणे आवश्यक आहे हे त्यांनी सर्वांना सांगितले. शिवाय, बापूंनी आश्वासन दिले की 'तो (त्रिविक्रम) तुमच्या पाठीशी आहे याची खात्री बाळगा' आणि जो बापूंना आपले मानतो त्याला बापू कधीच टाकत नाहीत.

author avatar
Kshitija Natu

प्रतिक्रिया व्यक्त करा

Scroll to top