मी तुला कधीच टाकणार नाही – सदगुरु श्री अनिरुद्ध ११ जुलै २०१९

सदगुरु श्री अनिरुद्ध पितृवचन

( गुरुवार, दिनांक ११ जुलै २०१९)

हरि ॐ, श्रीराम, अंबज्ञ.
नाथसंविध्‌, नाथसंविध्‌, नाथसंविध्‌.

खूप दिवस झाले दादांकडे अनेक मंडळी येतात, प्रश्न विचारतात, आपली व्यथा मांडतात. परंतु काही प्रश्न माझ्या मनाला लागून राहिले आणि especially काही गेल्या दिवसांमध्ये, नेमके गेल्या पाच-सहा आठवड्यांत, दहा-बारा लोक आले. खरंच सांगतो This message is for everybody हर एक के लिये यह संदेश है मेरा। मी वाक्य उच्चारलेलं आहे - ‘मी तुला कधीच टाकणार नाही’. पण प्रत्येकाला प्रश्न पडतो. एकाने विचारलं, ‘दादा, मी खूप पापं केली आहेत हो आयुष्यामध्ये, आज चाळीस वर्षाचा आहे.’ दादा म्हणाले, ‘काय झालं?’ ‘मी माझ्या मालकाला फसवलं, आईवडिलांना फसवलं, बायकोला फसवलं, मी माझी वाईट व्यसनंही केली, मी जुगारही खेळलो आणि अजूनही माझं सगळं चालूच आहे. मी नाही ह्यातून बाहेर पडू शकत.’

ठीक आहे ना, तरीही ‘मी तुला टाकणार नाही.’

एका स्त्रीने येऊन सांगितलं. बर्‍याच स्त्रियांनी सांगितलं, पण एका स्त्रीचं उदाहरण देतो. ‘दादा, खरंच सांगते. लग्नाच्या आधी चुका झाल्या, लग्नानंतरही झाल्या, अजूनही होत आहेत. नवरा चांगला आहे माझा. पण होतात माझ्या हातून चुका, कळत नाही....मला नाही थांबवता येत.’

मान्य आहे मला, चूक आहे तुझी, तरीही ‘मी तुला टाकणार नाही, नक्कीच नाही.’

एकाला त्याची बायको घेऊन आली, म्हणाली ‘दादा, हे दारू प्यायचे, ह्यांना ‘दारू सोडा, दारू सोडा’ सांगून मी थकले आणि शेवटी मीही दारू प्यायला सुरुवात केली. आम्ही दोघंही दारू पितो आता, आता सोडवत पण नाही, सुटत पण नाही, दारू नाही प्यायलो तर हातपाय थरथरतात. बापूंचा फोटो घरात ठेवू का आम्ही?’

ठेवा....तरीदेखील ‘मी तुम्हाला टाकणार नाही.’ Yess....अरे अनेक गोष्टी असतील, किती चुका असतील, अगदी लाखो असतील....तरीदेखील ‘मी तुम्हाला टाकणार नाही.’ बघा, मी कुठली अट घातलीय का? Have I put any condition about this sentence? ह्या वाक्याच्या आधी कधी अट घातलीय का? any conditon टाकलीय का? Unconditional Words आहेत माझे, की ‘मी तुला कधीच टाकणार नाही,’ I will never forsake you, I have never put any condition before that. It is unconditional. मी काय मागितलं त्याच्या बदल्यात? फक्त तुमचा विश्वास असू दे माझ्यावर, बस्स् thats all! प्रेम असू दे. मग ‘माझं हे चुकलं, ते चुकलं, ते चुकलं, मी अमूक करतोय, मी तमूक करतोय.’ असेल....जरी तुम्हाला किती लोकांनी सांगितलं की ‘तू पापी आहेस’ तरी मागेही मी अनेक वेळा सांगितलंय कि ‘येस, अनिरुद्ध पाप्यांसाठीच आहे. I am for everyone.’ कोणीही तुम्हाला थांबवू शकणार नाही आणि मला तर थांबवण्याचा चान्सच नाही. त्यामुळे मनातले हे विचार काढून टाका.

एक पती-पत्नी आले होते. म्हणाले, ‘बापू, आम्ही आमच्या आईशी खूप वाईट वागलो त्या काळामध्ये. हिचं आणि आईचं भांडण होतं. ही पण वाईट वागली. हिचं ऐकून मी वाईट वागलो आणि आई एकाएकी गेली आणि आता खूप वाईट वाटतंय.’ झाली चूक....मोठी चूक झाली. हरकत नाही, पण त्यातून बाहेर या ना. दुसर्‍या वृद्धांची सेवा करा. चूक घडली....माणूस आहात, प्रत्येक चुकीसाठी परिमार्जन आहे आणि भक्ती हा सगळ्यात श्रेष्ठ उपाय आहे ह्यासाठी आणि ज्याक्षणी मी हे वाक्य उच्चारल २००६ साली की ‘मी तुला कधीच टाकणार नाही’, त्यावेळी मी कुठली कंडिशन टाकली होती का, की ‘असं वागलास तर मी टाकणार नाही, तसं केलं नाही तर मी टाकणार नाही, की असं केलं तर टाकणार नाही?’ नाही. मैंने कोई शर्त नहीं रखी है| I have not put any condition, I really want to tell every one. मला सगळ्यांना सांगायचं आहे मनापासून - राजांनो! हे सगळे मनातले विचार काढून टाका. कोणी तुमच्याकडे काही सांगायला आले तर त्याला सांगा, ‘काळजी करू नकोस. अगदी दारू प्यायची सवय सुटत नाही आहे ना, तर बापूचा फोटो हातात धरून दारू पी, हरकत नाही. काही नाही बिघडणार. खरंच सांगतो मनापासून तुम्हाला राजांनो, काही नाही बिघडणार. अगदी मनापासून सांगतो - खरंच काही बिघडणार नाही.

काही जण सांगतात, ‘आमच्या गळ्यात लॉकेट असतं बापूंचं आणि हातून चूक घडते.’ अरे घडू दे ना! मी निस्तारीन बसून. तुम्ही एवढं स्वत:च्या डोक्यावर ओझं का घेताय? मग माझ्या वाक्याचा उपयोग काय, ‘मी तुला कधीच टाकणार नाही.’ मी उगाच येऊन फक्त बडबड करायची का? नाही. ही वाक्यं तुम्ही ऐकता ना राजांनो, जपून ठेवा ही वाक्यं. मी कुठलीही शर्त, कुठलीही अट टाकलेली नाही आहे, I have not put any condition, I will never foresake....I will never foresake. मी तुला कधीच टाकणार नाही....मी तुला कधीच टाकणार नाही. मैं तुम्हारा कभी त्याग नहीं करूँगा....मैं तुम्हारा कभी त्याग नहीं करूँगा। आप लोगों ने छोड़ने की ठान ली, तो बात अलग हैं। तुम्हाला हात सोडायचा असेल तर गोष्ट वेगळी, पण मी कधीच टाकणार नाही.

अगदी वेश्याव्यवसाय करणार्‍या स्त्रीने तिच्या कॉटच्या बाजूच्या टेबलावर माझा फोटो ठेवला तरी तो मला मान्य आहे. येस्स्, कारण ती पण एक स्त्री आहे, ती पण एक मानव आहे. तिची पण काहीतरी मजबूरी आहे, कोणी हौसेने ह्या गोष्टी करत नाही. काहीही असेल, तुमच्याकडे कुठलीही विकृती असेल, ‘बापू, आमच्याकडून विकृत गोष्टी घडतात, दादांना सांगितलं.’ अरे असेल....तुम्हाला ती विकृती वाटेल, कोणाला वाटत नसेल पण तरीदेखील मी तुम्हाला टाकणार नाही म्हणजे नाही. मग ह्यापुढे स्वत:च्या जवळच्या आप्तांनी, मित्रांनी बोललं तर तुम्ही स्वत:ला सांगा, ‘असेल, so what? म्हणून काय एवढं मोठं आहे! बापू आपल्याला कधीच टाकणार नाही.’

मला आज कुठल्याही मोठ्या प्रवचनाविषयी बोलायचं नाहीये, कुठल्याही शब्दाविषयी, कुठल्याही नामाविषयी, कुठल्या मंत्राविषयी, कशाविषयीही बोलायचं नाहीये. (मला फक्त हेच सांगायचं आहे) की जे माझं promise आहे, ‘मी तुला कधीच टाकणार नाही’ ते कायम आहे, नित्य आहे आणि निरपेक्ष बुद्धीने आहे. बस्स्!

अरे मनाला किती क्लेश द्यायचे? मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलंय, तुमचं जीवन अतृप्त राहील, अधर्वट राहील असं जे वाटतं ना, ते सोडून द्या. आहे तुमची जबाबदारी घ्यायला कोणीतरी समर्थ....आहे, १०८ टक्के आहे. सारखं स्वत:ला दोष देत बसायचं, मी हे केलं, मी तमुक केलं, मी तमुक केलं, (ते सोडून द्या). चुकलं ना, कान धरून क्षमा मागायची, गुपचूप तीसुद्धा....दहा लोकांच्या समोर मागायची गरज नाही आणि पुढे चालायला लागायचं. मला सांगा, रस्त्याच्या प्रत्येक अडथळ्याला जर तुम्ही थांबायला लागलात तर कधीतरी तुमचा प्रवास पूर्ण होईल का? नाही. आगगाडीमध्ये तुम्ही बसता, ट्रेनमध्ये बसता, तेव्हा ट्रेन ड्राईव करणारा जो ड्रायव्हर असतो, त्याच्यावर विश्वास ठेवून गाडीत बसताच की नाही? हे दररोजच्या तुमच्या आयुष्यामध्ये घडतं, मग एवढा तरी विश्वास बापूंवर टाका ना.

बापूने सांगितलयं आम्हाला, ‘मी तुम्हाला कधीच टाकणार नाही’ म्हणजे टाकणार नाही, मग त्याला कुठलीही अट नाहीये. ह्याचा अर्थ मी तुम्हाला सांगत नाहीये, तुम्ही वाईट वागू नका किंवा चुका करू नका, पापं करू नका. नाही....जेवढं टाळता येईल, तुमच्यात जेवढी शक्ती आहे त्या शक्तिनिशी तुम्ही टाळायला बघा. पण माणसाची शक्ती शेवटी केवढी असणार? मानवाची शक्ती कमी पडते. त्याला अनेक मोह पडतात, अनेक चुका घडतात. का घडतात माणसाच्या हातून चुका? त्याला विरोध करण्याची माणसाची शक्ती कमी पडते म्हणून. मग ती कमी पडतेय हे मला मान्य आहे ना राजांनो. मी कशाला टाकीन तुम्हाला?

हा विचार मनात ठेवा की आमचा बापू आम्हाला काहीही झालं तरी टाकणं शक्य नाही. अगदी गटारात लोळून बाहेर आलात तरी लक्षात ठेवा कि माझा बापू येईल आणि मला धुवून काढेल. बापूला जराही घाण वाटणार नाही आणि कधी वाटलेलीदेखील नाही, आलं लक्षामध्ये? पण हे लक्षात ठेवा. स्वत:ला एवढा दोष देत-देत जगू नका, त्याने मला जास्त वाईट वाटतं. तुमच्या चुकांनी जेवढं मला वाईट वाटतं ना, तर त्याच्या शंभर पट, जेव्हा तुम्ही स्वत:ला दोष देत राहता आणि त्या ओझ्याखाली जगता ना, तेव्हा मला जास्त वाईट वाटतं लक्षात ठेवा. ओझं घेऊन जगायची माझ्या बाळांना काहीही आवश्यकता नाही, मी समर्थ आहे तुमची सगळी ओझी वाहायला, येस्स्.

मी १९९७ साली सांगितलं होतं एक वाक्य महत्त्वाचं, कोणाला आठवतं का? कुठलीही घाण साफ मी करू शकतो आणि चुटकीसरशी करू शकतो. समजलं? आणि हे काम करायला मला अतिशय आवडतं. मग तुमच्या जीवनातली घाण असो, तुमच्या मनातली घाण असो, तुमच्या वृत्तीतली घाण असो, तुमच्या आजूबाजूची घाण असो की तुमच्या जन्मातली घाण असो; माझी झाडू सगळीकडे पोहचू शकते. समजलं? understand? समझ रहे हो?

तर आजपासून ही वृत्ती, तुम्ही जे लोक ऐकताय त्यांनी सोडून द्यायची आणि जे कोणी तुमचे मित्रपरिवारातील असतील, आप्तपरिवारातील असतील, आपल्या बापूपरिवारामधले असतील, त्यांना सांगायचं कोणी बोललं तर - ‘काळजी करू नको रे, काळजी करू नको. बापू नाही टाकत कोणाला. काहीही झालं, कितीही टोकाची गोष्ट असली तरी बापू टाकणं शक्य नाही आणि त्याला अपवादच नाही.’

जर तुम्ही सोडायचं म्हटलं बोट तर माझा नाईलाज आहे. तुम्ही जोपर्यंत धरलेला हात सोडत नाही, बोट सोडत नाही, मी धरलेलं बोट तुम्ही सोडत नाही; मी तुम्हालाही माझं बोट पकडा म्हणून सांगत नाहीय. मी तुमचं बोट पकडलंय आणि ते मी सोडणार नाही. तुम्हाला सोडून घ्यायचं, तुम्ही सोडून घेऊ शकता.

पण ह्या कलियुगामधल्या अशा ह्या विचित्र अवस्थेमध्ये मानवाची ताकद किती असणार आहे? मनाची ताकद तुमची किती स्ट्राँग आहे? किती स्ट्राँग आहे प्रत्येकाचं मन, मला सांगा? किती प्रकारची भीती असते तुमच्या मनामध्ये? किती प्रकारच्या काळज्या असतात? किती प्रकारच्या चिंता असतात? किती प्रकारचे प्रश्न असतात? कधी शारीरिक व्याधी असतात, काही डोक्याला ताप असतात. कुठे पगार कमी पडतो, कुठे नोकरी लागत नाही, कुठे शि़क्षण होत नाही, कुठे परिश्रमाला यश येत नाही, कोणी आजारी असतं, कोणाचं घर जातं, कोणाची नोकरी जाते....अरे शंभर गोष्टी असतात ना दररोज? मग ह्याच्यामध्ये मन किती स्ट्राँग राहणार आहे माणसाचं? मग अशा weak असलेल्या मनामधून काही ना काही चूक घडतेच आणि कधी नको त्या ठिकाणी घडत असेल.

आणि म्हणून तो ‘मन:सामर्थ्यदाता’ जो आहे ना, तो जाणतो. तो ‘मन:सामर्थ्यदाता’ का बनलाय? त्याला माहितीये माणसाची शक्ती limited आहे, मर्यादित आहे, ती कमी पडू शकते आणि मनाची शक्ती कमी पडते म्हणूनच चुका घडतात. नाही तर चुका घडणारच नाही.

म्हणूनच लक्षात ठेवा आजपासून की ‘मी तुला कधीच टाकणार नाही’; आणि ह्यासाठी मी कुठलीही अट ठेवलेली नाहीय. Unconditional....I will never foresake you. बिनशर्त मैं तुम्हाला त्याग कभी नहीं करूँगा। समजलं? [हो] नक्की? [नक्की]

आज मला सगळ्यांनी promise द्यायचंय. नक्की? [नक्की]. मी सांगेन तसं म्हणणार? [हो].
Dad [Dad] Promise [Promise] Forever Promise [Forever Promise],
Dad [Dad] Promise [Promise] Forever Promise [Forever Promise],
Dad [Dad] Promise [Promise] Forever Promise [Forever Promise]

ज्यांना इंग्रजी बोलता आलं नसेल त्यांनी फक्त ‘राम, राम, राम’ तीन वेळा म्हणा बस पुरेसं आहे. आपण सगळे म्हणू या.
राम [राम], राम [राम], राम [राम].

o.k.? So आजपासून काही प्रश्न असेल तर दादांकडे जरूर जायचं, मन मोकळं करायचं. पण मनावर ओझं ठेवायचं नाही. o.k.? [yes]
आज आपल्या सगळ्यांमध्ये deal झालेलं आहे? [yes]
नक्की? [नक्की]
आणि तो परमन्टट आहे [yes].

॥ हरि: ॐ॥ श्रीराम ॥ अंबज्ञ॥
॥ नाथसंविध्‌॥ नाथसंविध्‌॥ नाथसंविध्‌॥
I Love You All.

Scroll to top